शेअर मार्केटमधून नफा मिळवण्यासाठी टिप्स
शेअर मार्केट मधील प्रत्येक गुंतवणूकदाराला आपण वॉरेन बफे यांच्यासारखे यशस्वी गुंतवणूकदार व्हावे असं वाटत असते. व्यवसायात भागधारक म्हणून भाग घेण्याकरता गुंतवणुकदारांसाठी इक्विटी हा सर्वात सोपा मार्ग आहे.
इक्विटी गुंतवणुकीमुळे तुम्ही राष्ट्राच्या किंवा जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये प्रत्यक्ष सहभागी ही होऊ शकता, आणि अशाप्रकारे गुंतवणूक करून तुम्ही स्वता:ची संपत्ती निर्मिती सुद्धा करू शकता.
आतापर्यंत हेच सिद्ध झाले आहे की इक्विटी मार्ग म्हणजेच संपत्ती निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, पण त्याच मालमत्तेच्या वर्गाने कधीकधी प्रचंड संपत्तीचा विनाशही पाहिला आहे.
म्हणून तर शेअर बाजाराला काही लोक जुगार म्हणतात पण यशस्वी गुंतवणूकदार असं कधीच म्हणत नाहीत. मग ते असं काय करतात ज्यामुळे त्यांना यशस्वी गुंतवणूकदार म्हणले जाते? इक्विटी मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी काय करायला हवं?
त्यासाठी शेअर मार्केट मधील काही दिग्गज लोकांनी काही महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. त्या टिप्स वापरून तुम्ही एका सामान्य गुंतवणूकदार पासून असाधारण गुंतवणूकदार होऊ शकता.
टिप्स खालील प्रमाणे :
चक्रवाढची जादू कधीच दुर्लक्षू नका :
आइन्स्टाइन एकदा म्हणाले होते कि
‘चक्रवाढ’ हे जगातील आठवे आश्चर्य आहे. ज्याला चक्रवाढ व्याजाची समज नाही तो परिपूर्ण गुंतवणूकदार होऊच शकत नाही.
यशस्वी इक्विटी गुंतवणूकदारांच्या मुख्य गुणांपैकी एक गुण हा हि आहे कि ते चक्रवाढ करण्याची शक्ती समजून आहेत. चक्रवाढ व्याजाचे सूत्र अगदी साधे आणि सोपे आहे. जमा झालेल्या व्याजावर व्याज मिळत जाते आणि गुंतवणुकीची रक्कम झपाटयाने वाढते.
या क्रियेला दीर्घावधीची जोड मिळाली तर विश्वास बसणार नाही अशी फलप्राप्ती होते. हे सोपे वाटत असले तरी, शिस्त आणि वेळ कालावधी येथे एक महत्त्वाची भूमिका निभावतात.
काही गुंतवणुकदार हवी तशी अर्थप्राप्ती नाही झाली कि लगेच गुंतवणूक काढून घेतात या उलट यशस्वी गुंतवणुकदार गुंतवणूकीस लक्षणीय वेळ देतात.
यशस्वी इक्विटी गुंतवणूकदार लाभांश वापरत नाहीत किंवा लाभांश किंवा इतर कुठल्याही उत्पन्नाची पुनर्नियुक्ती करत नाहीत फक्त मुख्य पोर्टफोलिओ असणे इथ महत्त्वाचे आहे. चक्रवाढ व्याजाचे कार्ये निश्चित उत्पन्नाच्या गुंतवणुकीतही कमालीचे काम करते.
अफवांकडे दुर्लक्ष करा:
प्रसिद्ध गुंतवणूकदार जोसेफ केनेडी यांच्याबद्दल एक दंत कथा सांगितली जाते. १९२९ मध्ये वॉल स्ट्रीटवर शेअरचे भाव मोठय़ा प्रमाणावर गडगडले. केनेडी हे एका बूट पॉलिशवाल्याकडून आपले बूट स्वच्छ करून घेताना त्या माणसाने केनडी यांना बाजाराबद्दल काही सल्ले देण्यास सुरुवात केली.
केनेडी यांनी कार्यालयात आल्यावर त्यांचे सर्व शेअर विकून टाकले आणि नंतरच्या दोन दिवसांत वॉल स्ट्रीटवर होत्याचे नव्हते झाले.
शेवटी हि दंतकथाच, पण जेव्हा शेअरबाजार मोठ्या प्रमाणात चालते आणि खूप उंचावत असत, तेव्हा खूप गाजावाजा होतो. अश्या वेळी ज्या गुंतवणूकदारांना अनुभव नसतो अशी लोक इतरांशी त्यांचे अर्धवट ज्ञान पाजळत असतात.
यामुळे पैसे गुंतवणूक होणे सोडाच, आहे ते सुद्धा एक प्रकारचा जुगार होउन बसतो. त्यामुळे व्यर्थ चर्चेकडे दुर्लक्ष करा.
अश्या व्यवसायाबद्दल, कंपनीबद्दल अधिक जाणून घ्या जो व्यवसाय तुम्हाला स्वतः करावा वाटेल
कधीकधी लोक व्यवसाय समजून न घेता त्यामधील शेअर खरेदी करतात. बीएसईमध्ये सूचीबद्ध केलेल्या ५००० पेक्षा अधिक शेअर्सपैकी काहीची निवड करणे हे एक कठीण काम आहे.
सुरुवातीला काही नवीन उद्योगांमधून माहितीचे असलेले किंवा ज्याचे उत्पादने वापरले असतील उदा : (औषधे, सौंदर्यप्रसाधन, अन्न), वाहने आणि त्यांचे घटक किंवा आपण वापरत असलेले औद्योगिक सामान अश्या गोष्टींपासून सुरुवात करायला हरकत नाही.
ज्याची बाजारात मोठी विक्री दर्शवते अश्याच नवीन प्रोडक्ट बद्दल दुकानदार तुम्हाला जास्ती सांगू शकतो. तुम्ही जर स्वतः ठराविक वेळ दिलात तर चांगल्या प्रकारे चांगल्या उद्योगामध्ये गुंतवणूक करू शकाल.
गुंतवणूक करताना शेअर बद्दलची आर्थिक स्थिती तपासून घ्या
आपल्या शेअर मार्केटमधील गुणवत्तापूर्ण शेअर विकत घेताना, आर्थिक गुणोत्तर (financial ratios) समजून घेणे फायद्याच ठरू शकते. इक्विटी गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी गुंतवणूकीसाठी दोन फायद्याचे घटक सांगितले आहेत ते म्हणजे नियोजित भांडवलावर परतावा (return on capital employed (ROCE) ) आणि मूल्य-कमाई गुणोत्तर (price-earnings (P/E) ratio).
ROCE हे व्यवसायातून नफा मिळवण्याच्या टक्केवारीचे सूचक आहे. स्वाभाविकच,ज्या कंपनीचा ROCE चांगला आहे त्या कंपनीचा व्यवसाय हि चांगला असणार आहे. बॅंकेच्या व्याजदराच्या तुलनेत ROCE कमी असणे म्हणजे तो एक अकार्यक्षम व्यवसाय दर्शवते ज्याला आपण टाळलेच पाहिजे.
पी / ई गुणोत्तर हे पे-बॅक कालावधी दर्शविते, किंवा स्थिर कमाईमध्ये गुंतविलेल्या भांडवलाची परतफेड करण्यासाठी गुंतवणुकीसाठी किती वर्षे लागतील याची संख्या. प्रत्येक शेअरची किमत आणि उद्योगाचे उत्पन्न काय असावे याचे गुणोत्तर ठरलेले असते. जोपर्यंत व्यवसाय जलद गतीने वाढत नाही तोपर्यंत कमी पी / ई गुणोत्तर हे जास्ती आकर्षक असते.
योग्य वेळी गुंतवणूक करा
सामान्यता घरातील वयस्कर लोकांना कुठल्या वेळी, कुठल्या सीजन मध्ये काय किराणा माल किती किमतीमध्ये भरायचा आहे हे चांगल माहित असत. शेअर मार्केट चे सुद्धा असच असत. १८ व्या शतकात बॅरोन रोथस्च्यल्ड यांनी म्हटले होते की “The time to buy is when there’s blood on the Streets,”.
म्हणजे जेव्हा मार्केट खूप खराब पद्धतीने कोसळलेल असते तेव्हा खरेदी करण्याची योग्य वेळ असते” बॅरोन यांनी नेपोलियन विरूद्ध वॉटरलूच्या लढाई दरम्यान मार्केट स्थिर नसताना खूप चांगले दर्जेदार शेअर खरेदी केली होती. एक इच्छित शेअरची सुची तयार करा आणि थोडी थोडी खरेदी करत माल विकत घेणे सुरू करा.
जेव्हा मार्केट कोसळलेल असेल तेव्हा खरेदी करून त्यात भर घाला आणि जेव्हा सर्वजन शेअर बद्दल चर्चा करायला सुरुवात करतात तेव्हा ते विकून टाका.
“शेअर अगदी तळाशी असताना खरेदी करने किंवा चांगल्या उच्च स्थितीत असताना विकने हे केवळ जादूगार आणि बोलबच्चन लोकांसाठीच आहे, खूपच चांगला रिटर्न १४ वर्षांखालील सेन्सेक्स पीई श्रेणीत खरेदी करता येतो आणि पीई 23 च्या जवळ आणि त्यापेक्षा जास्त पुढे जात असताना विक्री करता येतो ”
संयम…!यशस्वी गुंतवणूकदार अत्यंत संयमी असतात. ते त्यांची उद्दिष्टे आणि भावना कधीच एकत्रित आणत नाहीत. बाजारातील अस्थिरतेच्या भीतीचा गुंतवणुकीवर परिणाम होऊ न देणे अशी विलक्षण क्षमता त्यांच्यात असते.
काही ठराविक कालावधीत शेअर बाजार अस्थिर असतोच आहे. ह्या अस्थिरतेमुळे त्यांच्यात एक प्रकारे तेवढ धाडसच निर्माण होत. हि अस्थिरता सामान्य आहे अशी भावना करून घेतात.
यशस्वी गुंतवणूकदारांना हे ठाऊक आहे की स्टॉक मार्केट हे कमाईचे, नफ्याचे गुलाम आहे आणि म्हणूनच चांगल्या कंपन्या कमी किमतीत सौदेबाजीसाठी ह्याच अस्थिरतेच्या आडून संधी साधत असतात.
इक्विटी गुंतवणूकीसाठी नेहमीच वेळ द्यावा. तेव्हाच त्याची फळे मिळतात. अस्थिरतेच्या काळात सुद्धा काही कंपन्यांनी चांगला परतावा दिलेला आहे.
स्वतः थोडा अभ्यास, संशोधन करा:
यशस्वी गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूक क्षमतेच्या बाबतीत स्वतःला ओळखून असतात आणि ते त्यांचे मूलभूत संशोधन करतात, कंपन्यांचे विश्लेषण करतात, गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतात आणि ज्या उद्योगांची उत्पादने आणि त्यांच्या योजना त्यांना आवडतात त्यांच्यामध्ये ते गुंतवणूक करतात.
ज्या विषयात त्यांना समजते, ज्या बद्दल त्यांना माहिती आहे तिथेच ते पूर्ण विश्वासाने गुंतवणूक करतात म्हणूनच त्यासाठी अभ्यास असावा लागतो.
यशस्वी इक्विटी गुंतवणूकदार सामान्यत: गुंतवणुकीसाठी अगदी सोपा दृष्टिकोन बाळगतात. ते त्यांचा पोर्टफोलिओ कधीच गुंतागुंतीचा ठेवत नाहीत. त्यांचे पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण (diversified) असतात.
यशस्वी इक्विटी गुंतवणूकदार सतत योजना बदलताना दिसणार नाहीत. ते भविष्यावर लक्ष केंद्रीत करून असतात. कमी खर्चात उत्तम संपत्ती निर्मिती कशी करायची याची त्यांना चांगली जाण असते.
चिल्लर किवा कमी किमतीच्या शेअर खरेदीचा मोह टाळा
साधारणपणे यशस्वी गुंतवणूकदार कधी कमी किमतीच्या किवा छोट्या शेअर मध्ये गुंतवणूक करताना दिसणार नाहीत. अश्या प्रकारचे शेअर बहुतांश पैकी कमी ट्रेड मध्ये(. खरेदी विक्री साठी) असतान दिसतात असतात.
अश्या शेअरचा performance खराब असतो म्हणून तर ते चिल्लर राहिलेले राहतात किवा कमी किमतीचे राहतात.
यशस्वी गुंतवणूकदारांना हे समजलेल असते कि अश्या चिल्लर शेअर मध्ये आपण पैसे गमावून बसण्याची शक्यता जास्ती असते. असे शेअर पडण्याचा धोका अधिक असू शकतो, आणि परताव्याची शक्यता हि कमी असते.
गुंतवणुकीसाठी साधा दृष्टिकोन :
इक्विटीमध्ये चांगल्या लाभांसाठी चांगल्या आर्थिक सल्लागाराला भेटून तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चि्त करा आणि योग्य दिशेने गुंतवणुकीला सुरवात करा.
Very nice.. quite informative. good
ReplyDeleteInformative write-up!
ReplyDeleteImportance of savings is
well-explained. Thoughtful investment is the need of the hour.
Mast👌👌
ReplyDeleteयोग्य निर्णयक्षमता नफा मिळवून देते.
ReplyDeleteGood information 👍
ReplyDeletevery nice
ReplyDeleteGood information 👍
ReplyDeleteGood information 👍
ReplyDeleteGood information
ReplyDeleteReally nice and positive information for share market investers 👍👍👌👌
ReplyDeleteVery nice👍
ReplyDeleteGreat tips
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice information 👍
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteविषय प्रभावि आहे. योग्य असे विश्लेशण आणि विषयाचे उहापोह केले आहे
ReplyDeleteGood
ReplyDeleteGood work
ReplyDeleteGood and positive information for share market investers 👍👌
ReplyDeleteNice work👍
ReplyDeleteVery nice 👌👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteGood Information
ReplyDelete